धुळे । मोबाईलवरुन एटीएम कार्ड विचारुन ऑनलाइन 75 हजार रुपये चोरून एकास गंडविल्याचा प्रकार 31 रोजी दुपारी घडला असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दीड तासात 75 हजार लंपास
अवघ्या दिड तासात 75 हजार रूपये बँक खात्यातून काढण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात विलास परदेशी यांचे येताच त्यांनी शहर पोलिसात धाव घेवून रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार ज्या मोबाईलवरुन फोन आला होता. त्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल झाला.
मोबाईल अॅपचा वापर
येथील कृषीनगर, दक्षता पोलीस कॉलनीत राहणर्या विलास पितांबर परदेशी यांना काल दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन आला होता. यात समोरच्या इसमाने विलास परदेशी यांना त्यांच्या नविन एटीएम कार्ड नंबर वरील 16 आकडे विचारले. यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी कोड(वन टाईम पासवर्ड) आला. हा कोड देखील त्याने 13 वेळा विचारुन परदेशी यांच्याकडून खात्री करुन घेतला. विविध मोबाईल अॅपद्वारे सुमारे 75 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.