खात्रीलायक विक्रेता निवडावा : ज्या संकेतस्थळावरून खरेदी करत आहोत ते जरी नावाजलेले असले तरी तेथे उपलब्ध विक्रेता नेमका कोण आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य धोक्यांपासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. जागरुकपणे व्यवहार केल्यास अनेक गोष्टी टाळू शकता. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारखी संकेतस्थळे विक्रेत्यांचा तपशीलही उपलब्ध करून देतात. यामध्ये अनेकदा हा विक्रेता कोण, तो किती वर्षे या व्यवसायात आहे आदी तपशील दिलेला असतो. जर भविष्यात काही अडचण झाली तर आपण थेट त्या विक्रेत्याच्या विरोधातही तक्रार नोंदवू शकतो.
ऑनलाइन तपशील डिलीट करा : ऑनलाइन खरेदी करताना आपला सर्व तपशील द्यावा लागतो. यामध्ये मोबाइल क्रमांकापासून ते घरच्या किंवा कार्यालयाच्या पत्त्यापर्यंतचा तपशील दिलेला असतो. हा तपशील शॉपिंग करण्यासाठी आवश्यक असला तरी शॉपिंग झाल्यावर जर आपल्याला पुन्हा त्या संकेतस्थळावर यायचे नसले तर हा सर्व तपशील डिलीट करावा. कारण अनेकदा अशा संकेतस्थळांमधून माहिती चोरी होण्याची दाट शक्यता असते. यामुळे ही सावधगिरी बाळगल्यास भविष्यात उद्भवणार्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते. याचबरोबर आपल्या कोणत्याही कार्डाचा तपशील कोणत्याही संकेतस्थळावर कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवू नये. म्हणजे ‘अॅड अॅज फेव्हिरेट कार्ड’ हा पर्याय निवडू नये. जर त्या संकेतस्थळावरील माहिती चोरी झाली तर आपल्या कार्डचा नंबरही चोरांच्या हाती लागू शकतो.
खाते सातत्याने तपासून घ्यावे : आपण ज्या शॉपिंग संकेतस्थळांवर आपले लॉगइन तयार करतो. त्याचा वापर साधारणत: वर्षांतून एकदा किंवा दोनदा केला जातो. जर तोही वापर झाला नाही किंवा आपला वापर अगदीच कमी झाला तर त्या खात्याचा दुरुपयोग होऊ शकतो. एखादा हॅकर ते खाते त्याच्या वस्तूंच्या खरेदीसाठी अथवा अन्य कोणत्याही कामासाठी वापरू शकतो. हे होऊ नये यासाठी सातत्याने आपले त्या संकेतस्थळावरील खाते सुरू करून काही वेळ ब्राऊझिंग करत राहा. जेणेकरुन खाते सतत सुरू असल्याचे दिसून येते. यामुळे हॅकिंग अथवा माहिती चोरी होण्याची शक्यता टाळता येते.
क्रेडिट कार्ड वापरावर भर द्यावा : आपल्याजवळ असलेल्या डेबिट कार्डमधून तातडीने पैसे वजा होतात आणि जर भविष्यात ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही किंवा अन्य काही अडचणी आल्यास ते पैसे मिळवण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो. याउलट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जर आपण पैसे भरले तर बँकेला पैसे जमा करण्यापूर्वी आपण खर्च केलेल्या रकमेची खात्री करून घेऊ शकतो. तसेच त्यात काही बदल असल्यास दादही मागू शकतो.
ओपन वाय-फायपासून सावधान : सध्या अनेक रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण अशा ठिकाणी ऑनलाइन व्यवहार करणे टाळावे. अशा ठिकाणच्या जोडणीतूनही माहिती चोरी होण्याची शक्यता असते. यामुळे खुल्या वाय-फाय जोडणीवर ऑनलाइन शॉपिंग किंवा खरेदीचे व्यवहार करून नयेत. आपली माहिती चोरी होऊ नये किंवा ऑनलाइन व्यवहारात आपली फसगत होऊ नये यासाठी आपण खूप काळजी घेत असतो. मात्र सुरक्षित इंटरनेट जोडणी असेल तरच या सर्व काळजीचा फायदा होतो.
पासवर्ड अवघड वापरावा : आपला पासवर्ड हा अगदी सोपा असू नये. यात आपले नाव किंवा जन्मतारखेचा समावेश नसावा. तसेच पासवर्ड हा अधिक मोठा असावा. म्हणजे किमान 8 अक्षरांचा पासवर्ड असणे केव्हाही सुरक्षित ठरू शकते. या पासवर्डमध्ये एखादे तरी विशेष अक्षर तसेच आकडे असणे गरजेचे आहे. विशेष अक्षर म्हणजे %,ऽ यांचा समावेश असावा. तसेच पासवर्डमध्ये कॅपिटल अक्षरही असावे. जेणेकरून तुमचा पासवर्ड चोरांना समजू शकणार नाही. एकच पासवर्ड सर्व ठिकाणी वापरू नये.
24लूट्स डॉट कॉम वर डेली डिल्स: 24 लूट्स डॉट कॉम तसेच दैनिक ‘जनशक्ति’च्या सहयोगाने ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या वस्तूंचा स्टॉक उपलब्ध आहे त्या वस्तू 48 तासांत आपण ऑनलाईन खरेदी करू शकता. दर 24 किंवा 48 तासांत या वस्तू बदलणार आहेत. ‘डेली डिल्स’वरही भरघोस सूट देण्यात आली आहे. या वस्तू खरेदी करताना आपल्याला मूळ किंमतीपेक्षा निम्म्या किंमतीत या वस्तू खरेदी करता येत आहेत. स्नॅपडिल, फ्लिपकार्ड, अमॅझोन, जबाँग डॉट कॉम, मिंत्रा डॉट कॉम, शॉपक्लूज डॉट कॉम, फर्स्टक्राय डॉट कॉम, बिगबास्केट, अर्बनक्लॅप, फ्युचरबाजार डॉट कॉम, गॅजेट डॉट इन, टेकशॉप, बिग अड्डा डॉट कॉम या विश्वासार्ह संकेतस्थळांसोबतच आता 24लूट्स डॉट कॉमवर ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ग्राहक आकर्षिला जात आहे. एवढेच नाहीतर ई-शॉपिंगचा आनंदही घेता येणार आहे. एक महत्त्वाची बाब नमूद करवीशी वाटते ती म्हणजे ई-शॉपिंग संकेतस्थळांवर खरेदी करताना सर्वाधिक खबरदारी पैसे भरताना घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे या सर्व संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ या पर्यायाचा वापर करावा. जेणेकरून आपली फसवणूक होईल ही शंका मनातून निघून जाईल. कारण जरी वस्तू आपल्यापर्यंत आली नाही तरी पैसे देण्याची गरज भासत नाही. काही संकेतस्थळांवर ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पर्याय उपलब्ध नाही किंवा काही संकेतस्थळे हा पर्याय निवडल्यावर अतिरिक्त पैसेही आकारतात. यामुळे अनेकदा आपल्याला आधी पैसे भरून मगच ऑर्डर नोंदवावी लागते. अशा वेळी पैसे भरताना नेहमी क्रेडिट कार्डचा वापर करावा.
सुनील आढाव- 7767012211