ऑनलाईन औषधी विक्री विरोधात निवेदन

0

चाळीसगाव मेडीसीन डिलर्स असोसिएशनतर्फे उद्या बंद
चाळीसगाव – ऑनलाईन औषधी विक्री विरोधात चाळीसगांव तालुका मेडिसिन डिलर्स असोसिएशनने उद्या अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या बंद संदर्भात उपविभागीय अधिकारी शरद पवार, नायब तहसीलदार नानासाहेब आगळे व शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

काय म्हटले आहे निवेदनात
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, केंद्र सरकार सध्या सर्व औषधांना ऑनलाइन विक्रीसाठी परवानगी देताना दिसून येत असून शासनाचा या व्यवस्थेवर कुठलाच अंकुश नाही ऑनलाईन कुरीयरबॉयकडून मिळणारी औषधे वितरित होऊन अनेकांना प्राण गमवावा लागु शकतो परंतु शासन या गोष्टीचा विचार करायला तयार नाही कुठलाही अंकुश नसल्यामुळे ऑनलाइनच्या माध्यमातून अनेक गर्भपाताची औषधे खुलेआम विक्री केली जातील काही नशा आणणारी औषधे कुठल्याही रेकॉर्ड शिवाय विकली गेल्याने येणारी पिढी व्यसनाधीन होईल अशा प्रकारच्या गोष्टींना खतपाणी घातले जाईल त्यातच ऑनलाईन औषधांच्या उपलब्धतेमुळे देशातील आठ लाख केमिस्ट बेरोजगार होऊन त्यांची दुकाने बंद पडल्यास तात्काळ लागणाऱ्या औषधांची म्हणजेच अत्यावश्यक औषधाची उपलब्धता होणार नाही. परिणामी येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला वाईट परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काही लोकांना प्राण गमवावे लागू शकतात वरील प्रकार थांबवण्यासाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन हा बंद पाळत आहे.

निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
तालुकाध्यक्ष योगेश भोकरे सचिव प्रेमसिंग पवार, सेन्ट्रल झोन सदस्य संदीप बेदमुथा, प्रदीप देशमुख, वसंतराव चव्हाण, संदीप जैन, योगेश येवले, विनोद आचलिया, महेश येवले, धनंजय पाटील,विलास पाटील, निशांत पाटील, प्रशांत मालू, पुष्पा चौधरी, वर्षा अहिरराव एकनाथ पाटील, महेश कुमट, पहेलाज बजाज, अमोल राऊळ, किशोर महाजन, चंद्रशेखर पाटील, सत्यजित पाटील, शेखर पाटील, जयेश पाटील व सदस्य उपस्थित होते.