एटीएमवरील 16 अंकी नंबर, पासवर्ड मिळवून भामटेगिरी
एका घटनेत 36 हजार दुसर्या घटनेत 91 हजाराची फसवणूक
जळगाव– शहरातील तीन ते चार जणांना वेगवेगळ्या प्रकार भामट्यांनी ऑनलाईन गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मध्यप्रदेश 2019 प्रदर्शन व विक्रीमध्ये तीन जणांना एटीएम पॉस मशीवर स्वाईप करण्याच्या बहाण्याने घेवून एटीएम व पासवर्डची माहिती मिळवून तीन जणांना 91 हजारात गंडविले तर दुसर्याने स्टेट बॅकेचा मॅनेजर बोलत असल्याचे भासवित एटीएमचा 17 अंकी नंबर व पिन मिळवून 36 हजार 200 रुपये काढून फसवूण केली. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अनोख्या शक्कली भामट्यांनी लढविल्या. मात्र कानून के हात लंबे होते है याचा प्रत्य देत सायबर पोलीस ठाण्याने आबीद अन्सारी वय 32 रा.जे.पी.नगर, भोपाल, मध्यप्रदेश तर रमेश शिवशरण वर्मा वय 44 रा.विद्यासागर कॉलनी, निरसा धनबाद झारखंड या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नशिराबाद येथील मोहन अशोक बर्हाटे यांच्या फोनवर अज्ञात व्यक्तीने फोन करुन मी स्टेट बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर बोलत असल्याचे भासविले. व एटीएम कार्ड बंद होत असून ते चालू करण्यासाठी एटीएम कार्डवरील 16 अंकी नंबर, 3 अंकी सीव्हीसी क्रमांक विचारला. यानंतर बर्हाटे यांना भामट्याने मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांकही विचारुन त्यांच्या जळगाव पिपल्स बँकेच्या खात्यावरुन ऑनलाईन 36 हजार 200 रुपये परस्पर दुसर्या खात्यावर वळवून घेतले. याबाबत बर्हाटे यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली होती.
कार्ड स्वाईप होत नसल्याचे भामट्यांकडून नाटक
शहरातील रिंगरोडवरील यशोदया हॉल येथे काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश उत्सव 2019 प्रदर्शन व विक्री नावाने सेल लागला होता. या सेलमध्ये 31 जानेवारी 2019 रोजी अयोध्यानगर येथील मयुर रमेश भोळे, शरदचंद्र ठाकरे व श्वेता पाटील हे शॉपिंग करण्यासाठी गेले होते. सेलमधून त्यांनी काही सामान खरेदी केला. तिघांनी रोख रक्कम न देता एटीएम कार्ड स्वाईप करण्यासाठी दिल. कार्ड स्वाईप होत नसल्याचे नाटक करत मॅनेजरने पॉस मशीनच्या माध्यमातून तिघांच्या एटीएम कार्डची माहिती व पासवर्ड मिळवून भामट्यांनी मयुर भोळे यांच्या खात्यावरुन 40 हजार, शरदचंद्र ठाकरे यांच्या खात्यावरुन 30 हजार तर श्वेता पाटील यांचे 21 हजार असे एकूण 91 हजार ऑनलाईन परस्पर काढून घेतले.
सेल भरविणार्यालाच पोलिसांनी उचलले
सेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या ऑनलाईन फसवणुक प्रकरणी सेल भरविणारय आबिद अन्सारी सह सेलमधील मॅनेजर कार्तिक शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. प्रविण वाघ, सचिन सोनवणे, शंभुदेव रणखांब, अजय सपकाळे, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने सेल भरविणार्या आबिद अन्सारीला भोपाळहून अटक केली आहे. त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मॅनेजर कार्तिक शर्माचा शोध सुरु आहे.
पोलिसांना भटकविण्यासाठी भामट्यांच्या शक्कली
1 पोलिसांना सापडू नये व पोलिसांना ठिकठिकाणी भटकविण्यासाठी भामट्यांनी गुन्ह्यात अनोख्या शक्कली लढविल्या. यात सेलमधील ग्राहकांचा डाटा मिळविल्या नंतर भामट्यांनी मध्यप्रदेशातील हरदे येथील रेल्वे स्टेशन परिसरातील एटीएम व हरदे शहरातील कॉर्पोरेट बॅकेच्या एटीएमवरुन संंबंधित डाटा 91 हजार परस्पर काढले.
2 केरळ येथून अटक केलेला रमेश शिवशरण वर्मा हा बिहारच्या टोलनाक्यावर काम करतो. पैसे वर्ग झालेले खाते बिहार तर मात्र काढल्याचे ठिकाणी केरळ दिसत होते.
3 पोलीस निरिक्षक अरुण निकम यांनी भामट्यांच्या शक्कलीच बारकाईने अभ्यास केला. त्यानुसार ललीत नारखेडे, प्रशांत साळी, अभिषेक पाटील यांना तपासकामी रवाना केले. पथकाने केरळ राज्यातील त्रिशुल येथून रमेश शिवशरण वर्मा यास अटक केली. त्याला 21 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.