1 Lakh 10 Thousand During Online Shopping To A Retired Station Master In Bhusawal भुसावळ : ऑनलाईन हेडफोन मागवताना भामट्यांना भुसावळातील सेवानिवृत्त स्टेशन मास्तरांना एक लाख 10 हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन शॉपींग करताना घातला गंडा
तक्रारदार रामदास माधवराव पडघण (61, रामायण नगर, कंटेनर एरीया, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी मायशॉपीडॉटकॉम या वेबसाईटवरून हेडफोन ऑर्डर केले मात्र ते आठ दिवस उलटूनही न आल्याने संबंधित साईटवरील ग्राहकसेवेशी संपर्क साधल्यानंतर नवीन ऑर्डर करण्याचे सूचित करण्यात आले. त्यानुसार पडघण यांनी 16 जुलै 2022 पुन्हा संपर्क साधल्यानंतर संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही मात्र 7033570844 या क्रमांकावरून कॉल आल्यानंतर संबंधिताने ऑर्डर केलेल्या वस्तूचा रिफंड करण्यासाठी पाठवलेल्या लिंकला क्लीक करून माहिती पाठवण्याचे सांगण्यात आले. पडघण यांनी माहिती भरून पाठवल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पाच ट्रान्झेक्शनद्वारे एक लाख नऊ हजार 399 रुपयांची कपात झाली.
लिंकला क्लिक करताच भामट्याने लांबवली रक्कम
फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर पडघण यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर मंगळवारी बाजारपेठ पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.