ऑलिम्पियाड परिक्षेत बियाणी स्कुलचे यश

0

भुसावळ। येथील बियाणी मिलीटरी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मुंबई स्टॉक एक्स्चेंज येथे पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्स फायनान्स ऑलिम्पियाड परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून योगेश्‍वरी जावळे, विजय पिसे, विश्‍वजित चौधरी, रितीक कुमावत या विद्यार्थ्यांची निवड झाली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन बियाणी एज्युकेशन गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगिता बियाणी, प्राचार्य डी.एम. पाटील तसेच त्यांना या परिक्षेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक रुद्रासेन गंढीया व टी.आर. बाविस्कर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.