ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये श्रीकांत

0

सिडनी । ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने उपांत्यफेरीत चीनच्या शी युकीला 21-10, 21-14 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केला.या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.

श्रीकांतने पहिल्या सेटमध्ये 11-7 अशी आघाडी घेत युकीला संधीच दिली नाही. श्रीकांतने चांगला खेळ करत पहिला सेट 21-10 ने जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये दोघांनीही 7-7 गुण मिळवले होते. पण श्रीकांतने आपले वर्चस्व कायम राखत सेटमध्ये 11-8 अशी आघाडी घेतली.

श्रीकांतने सेटच्या मध्यांतरानंतर पुन्हा सुंदर खेळी केली आणि 20-13 अशी आघाडी घेत सामना एकतर्फी केल्यानंतर शी युकीने 1 गुण मिळवला. पण श्रीकांतने लगेच 1 गुण मिळवून दुसरा सेटही जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला.