माऊंट माउंगानुई । अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवित भारतीय संघाने चौथ्यांना आयसीसी अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरले. भारतातर्फे मनजोत कालरा याने दणकेबाज 101 धावा केल्या. त्याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिलेले 217 धावांचे आव्हान भारतीय संघाने 38.5 षटकात पूर्ण केले. कालराने यष्टीरक्षक फलंदाज हार्विक देसाईच्या साथीने संघाचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
‘द वॉल’ची विश्वचषकात कमाल
भारतीय क्रिकेटमध्ये द वॉल म्हणून प्रसिद्ध असलेले राहुल द्रविड या संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या अंडर 19 संघाने पृथ्वी शॉच्या कर्णधारपदाखाली धमाकेदार प्रदर्शन केले. या विश्वचषकात एकाही सामन्यात भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. उपांत्य सामन्यात पाकला तब्बल 203 धावांनी धूळ चारल्यानंतर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतीय संघाने 8 गड्यांनी पराभव केला
बीसीसीआयकडून मोठ गिफ्ट
चौथ्यांदा विश्वचषक पटकावून इतिहास रचणार्या अंडर-19च्या टीम इंडियावर आता बक्षिसांचा वर्षाव सुरु झाला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूसाठी बक्षीस जाहीर केले आहे. अंडर-19 संघातील प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयने 20 लाख रुपयांचे तर प्रशिक्षक राहुल द्रविड यांना 50 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
भारताने जिंकलेले विश्वचषक
-2018 पृथ्वी शॉ, -2012 उन्मुक्त चंद, –
2008, विराट कोहली, – 2000 मोहम्म कैफ
भारतीय संघ 220/2
मनजोत- 101
हार्विक देसाई- 47
शुभम गील – 31
पृथ्वी शॉ – 29
ऑस्ट्रेलिया संघ 216/10
जे. मेर्लो- 76
पी. उप्पल- 34
जे. एडवर्ड- 28
मॅकस्विनी- 23