नवी दिल्ली । चॅम्पियन ट्रॉफीच्या दुसर्या सामन्यात न्युझिलंडने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाला सलामी जोडीने सार्थक ठरविण्याच्या दृष्टीने खेळण्यास प्रारंभ केला. मार्टिन गप्लिट व लुक रॉकी यानी 5 षटकात 40 धावा केल्या.मात्र पहिला फलंदाज याच धावसंख्येवर बाद झाला. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर 76 धावा झाल्या असतांना पाऊस आल्याने काही काळ खेळ थांबविण्यात आला. मात्र नंतर खेळ सुरू झाल्यानंतर 46 षटकांचा सामना करण्यात आला.यानंतर तिसर्या व चौथ्या क्रमाकावर चांगल्या भागीदार्या झाल्या न्युझिलंड 300 धावांचा पल्ला पार करणार असे चिन्हे दिसत असतांना संपुर्ण संघ 291 धावांवर बाद झाला.ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फलंदाजांना आळा घालण्यात अपयशी होत असतांना या सामन्यात पुनरागमन करित गोलदाज जोश हिजलवुड याने 9 षटके टाकत 6 फलंदाज तंबूत परत पाठविले.या गोलंदाजामुळे संपुर्ण न्युझिलंड संघ 45 षटके खेळून 291 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाला देवू शकला.न्युझिलंड कडून रॉकी (65),कर्णधार केन विलियमसन (100),रॉस टेलर (46) धावा केल्या.
चौफेर फटकेबाजी
बर्मिगहॅममध्ये सुरु असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. पावसामुळे खेळ थांबला आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या भेदक मार्याचा सामना करण्यासाठी न्यूझीलंडकडून मार्टिन गप्तील आणि राँची ही सलामीची जोडी मैदानात उतरली. त्यांनी सुरुवातीपासूनच चांगले फटके मारले. दोघांमध्ये चांगली भागिदारी होईल, असे वाटत असतानाच हेजलवूडच्या गोलंदाजीवर गप्टिल 26 धावांवर बाद झाला. सहाव्या षटकात गप्टिलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या विल्यमसनने चांगली फटकेबाजी केली. त्याने राँचीला चांगली साथ दिली. त्यांचा खेळ चांगलाच बहरत होता. दोघेही सुंदर फटकेबाजी करत होते. पण दहावे षटक सुरू असताना पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि खेळ पुन्हा सुरू झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे चार षटके कमी करण्यात आली. पावसाने काही वेळ बॅटींग केल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जबरदस्त बॅटींग केली. त्यांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. चौफेर फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला. संघाच्या 117 धावा फलकावर असताना राँची अर्धशतकी खेळी करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या टेलरने विल्यमसनला चांगली साथ दिली.
न्युझिलडंचा संघ 45 षटकात बाद
विल्यमसनने आपले शतक पूर्ण केले. तर टेलरने 46 धावा केल्या. पण दोघे तंबूत परतल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. एकापाठोपाठ एक गडी बाद होत गेले. पावसामुळे हा सामना 46 षटकांचा खेळवण्यात येत आहे. पण न्यूझीलंडचा डाव 45 षटकांत 291 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, पॅट कमिन्स, जॉन हॅस्टिंग, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हेनरिक्स, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटीन्सन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वॅड, अॅडम झाम्पा.