जळगाव । ओंकारेश्वर मंदिराजवळील शाह क्लासेससमोर लावलेली अडीच हजार रुपये किमतीची सायकल चोरीला गेल्याची घटना घडली असून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन त्र्यंबक पतंगपुरे(वय 80, रा.आदर्शनगर) यांच्या नातवाची सायकल ओंकारेश्वर मंदिर परिसरातील शाह क्लासेससमोर 10 मे रोजी सकाळी 8 ते 11 दरम्यान लावली होती. मात्र अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाची हर्क्युलस कंपनीची सायकल लंपास केली. छगन पतंगपुरे यांच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अनिल फेगडे हे करीत आहे.