पाचोरा : पाचोरा तालुक्यातील ओझरच्या तरुण शेतकर्याने सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. किशन पंडित सोनवणे (27) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्जापुढे हात टेकत शेतकर्याची आत्महत्या
ओझर, ता.पाचोरा येथील किशन पंडित सोनवणे (27) या शेतकर्याने सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळुन घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. सोमवार, 14 मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. वृद्ध आई, पत्नी व मुली बाहेरगावी गेलेले असल्यामुळे किशन सोनवणे हे घरी एकटेच होते. अतिशय होतकरू व मन मिळावु स्वभाव असलेल्या किशन सोनवणे यांच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, किशन यांच्याकडे एक बिघा शेती होती व सोबतच बाजार समितीमध्ये हमालीचे ही काम करायचे, असे सांगण्यात आले. मयत किशन सोनवणे यांच्या पश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, लहान भाऊ, एक विवाहित बहिण असा परीवार आहे.