ओझरमध्ये कुस्त्यांचा आखाडा

0

ओझर । श्री क्षेत्र ओझर येथे भाद्रपद गणेश जयंतीनिमित्त गेली पाच दिवस सुरू असलेला श्रींच्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता मॅटवरील कुस्त्यांच्या भव्य आखाड्याने झाली. नामवंत मल्लांनी कुस्त्या केल्या. पुणे, सोलापूर, नगर, मुंबई, सातारा जिल्ह्यांतील नामवंत मल्लांनी या आखाड्यास हजेरी लावली. ओझर आणि परिसरातील शिरोली बुद्रुक, खुर्द, तेजेवाडी, धालेवाडी, हिवरे बुद्रुक, खुर्द आदी पंचक्रोशीतील गावातील कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात आखाड्यास गर्दी केली होती.

आखाड्यात पंच म्हणून किशोर कवडे, कैलास घेगडे, गणेश राऊत, नरसोडे, भास्कर कवडे, मंगेश मांडे, लक्ष्मण टेंभेकर यांनी काम पाहिले. याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे, जिल्हा युवसेना प्रमुख गणेश कवडे, पंचायत समिती सदस्य गणपत कवडे आदी मान्यवरांच्या हस्ते मानाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. पहिल्यांदाच भरवलेल्या मॅटवरील कुस्त्यांचे आमदारांनी विशेष कौतुक केले व देवस्थान ट्रस्टच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या. आखाड्याचे समालोचन देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, उपाध्यक्ष सूर्यकांत गजानन रवळे, माजी अध्यक्ष नवनाथशास्त्री कवडे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, कैलास मांडे यांनी केले. यात्रोत्सवाचे नियोजन विघ्नहर गणपती देवस्थानने केले. या नियोजनामध्ये सचिव गोविंद कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त बबन मांडे, शंकर कवडे आदींचे विशेष सहकार्य लाभले.