भुवनेश्वर । पुरुषांच्या हॉकी वर्ल्ड लीग अंतिम फेरीच्या लढती आणि 2018ची पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचा मान ओडिशाला मिळाला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या दोन्ही स्पर्धा आपल्या राज्यात कलिंगा स्टेडियममध्ये होत असल्याची घोषणा केली. या स्पर्धा पुरुष हॉकी वर्ल्ड लीग अंतिम फेरी भुवनेश्वर 2017 आणि ओडिशा हॉकी पुरुष वर्ल्डकप भुवनेश्वर 2018 या नावाने ओळखल्या जातील. वर्ल्डलीग हॉकी स्पर्धेचे आयोजन 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2017 या कालावधीत होणार असून हॉकीची विश्वचषक स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत होईल. या स्पर्धांसाठी येणार्या सर्व संघांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येतील.