भुवनेश्वर- महिला सक्षमीकारणासाठी ओडीसा विधानसभेत विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव पारित केला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा प्रस्ताव आणला, यावर विधानसभेत खूप चर्चा झाली. त्यानंतर आवजी मतदानाने हा प्रस्ताव मजूर करण्यात आला.
सत्तारूढ बीजू जनता दल, विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि भाजपाने या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आणलेला हा प्रस्ताव ऐतिहासिक मानला जात आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. त्यात हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. १४७ विधानसभा सदस्य असलेल्या विधानसभेत सध्या १२ महिला सदस्य आहेत.