ओढा बळकटीकरणास होणार सुरुवात

0

नगराध्यक्ष घोगरे यांनी दिली माहिती

चाकणःचाकण (ता. खेड) येथील ओढ्यांचे बळकटीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील 1 कोटी 46 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शनिवारी (दि.30 रोजी) या कामांचा शुभारंभ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते व खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, अशी माहिती चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे व उपनगराध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश गोरे यांनी दिली. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील श्रीरामनगर (चाकण) येथे शनिवारी (दि.30) भूमिपूजन समारंभ झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, सेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, शहरप्रमुख महेश शेवकरी, माजी नगराध्यक्ष पूजा कड-चांदेरे, मंगल गोरे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, आरोग्य सभापती धीरज मुटके, सभापती प्रवीण गोरे, सेनेचे गटनेते किशोर शेवकरी, नगरसेवक ऋषिकेश झगडे, स्नेहा जगताप, निलेश गोरे, हुमा शेख, सुजाता मंडलिक, सुरेखा गालफाडे आदींसह नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम पाटील, उपमुख्याधिकारी शिवाजी मेमाणे, उद्योजक साहेबराव कड आदींसह सर्व नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी व चाकणकर नागरिक उपस्थित होते.