ओबीसीचे संघटन करणार -चौधरी

0

नंदुरबार। भाजपा ओबीसी मोर्चाची प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सांभाळन्याचा पहिला मान आपल्याला मिळाला असून एका वर्षांत आपण ओबीसीचे संघटन करण्यात यशस्वी झाल्याचा दावा विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. अल्पावधीतच भाजपाने ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

11 जुलै रोजी मुबंईत बैठक होणार असून या बैठकीत राज्यातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार, वृक्षारोपण,आदी उपक्रम राबविण्यावर चर्चा करण्यात येईल.त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य मेळावा घेण्यात येणार असून त्यात ओबीसीना आरक्षण मिळण्याबाबत चर्चा होणार आहे. ऑगस्टमध्ये 350 पदाधिकार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात येऊन त्यानंतर हे कायकर्ते राज्यात ठिकठिकाणी ओबीसी संवादयात्रा काढणार आहेत, अशी माहिती चौधरी यांनी दिली.