नंदुरबार। ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने केली आहे. जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सरकारच्या अनागोंदी कारभारामुळेच व ओबीसी समाजाबद्दल असलेल्या उदासीन भूमिकेमुळेच अध्यादेशाला स्थागिती मिळालेली आहे. पण आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत महाराष्ट्रातील ओबीसी गप्प बसणार नाही. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये, त्या सर्वं निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अन्यथा, भाजपा ओबीसी मोर्चा या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.