ओबीसी समितीचा निषेध मोर्चा

0
पिंपरी : कासारसाई येथील दोन अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व त्यातील एक मुलगी मरण पावली सदर कुटुंबाला न्याय मिळावा म्हणुन पिंपरी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
निषेध मोर्चा महात्मा फुले स्मारक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे करण्यात आले. प्रसंगी अंजना गायकवाड, छायावती देसले, सायुजता दोडके, हेमलता लांडे, नझिम अप्पा, मानव कांबळे, प्रताप गुरव, आनंदा कुदळे, सुरेश गायकवाड, प्रदिप पवार, गिरीष वाघमारे, वैजनाथ शिरसाठ, सिद्दीकी शेख, चेतन बेंद्रे, गणेश ढाकणे, श्रीवास्तव, दिलीप रणपिसे, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, सचिन वाघमारे आदींनी निषेध व्यक्त केला. निषेध मोर्चा प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांनी आंबेडकर चौक पिंपरी येथे येऊन स्वतः निवेदन स्विकारले. निषेध मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा देऊन प्रत्यक्ष सहभाग घेतला.