सर्व प्रकारच्या त्वचेला मिळवून देईल नवा तजेला
मुंबई :- आरोग्यपूर्ण, विशेष आणि तजेलदार त्वचा देणारी उत्पादने बनवण्याप्रति कटीबद्ध असलेल्या ओरिफ्लेमने ऑप्टिमल्स हायड्रा रेंजचे सादरीकरण केले असून त्वचेला नवा तजेला देण्यासाठी ही रेंज सादर करण्यात येत आहे. स्वीडीश वनस्पतींतील निवडक उपयुक्त घटकांपासून तयार करण्यात आलेली ही रेंज अॅण्टीऑक्सिडण्ट्स, जीवनसत्वे, उपयुक्त तेल, कल्पक वैज्ञानिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. ही व्यापक रेंज त्वचेतील ओलावा टिकवून ठेवत त्वचेचा तजेलदारपणाही टिकवून ठेवते, त्वचेचा रंग पुन्हा उजळ करण्यास मदत करते, चमक वाढवते, पाण्याची पातळी नियंत्रित ठेवते आणि त्वचेला अधिक मऊ करण्यास मदत करते.
ऑप्टीमल्स हायड्रा रेंजमधील वेगळेपण या स्वीडीश नैसर्गिक घटकांमध्ये दडलेले असून आपल्या सर्व प्रकारच्या त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा टवटवीत करून त्वचा आरोग्यपूर्ण, मऊसूत आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे तजेलदार बनवण्याचे काम हे घटक करतात. ऑप्टीमल्स हायड्रा रेंजमध्ये क्लिन्झिंग जेल, रिफ्रेशिंग टोनर, आय क्रीम, डे क्रीम, नाईट क्रीम आणि बॅलन्सिंग डे फ्लुईडचा समावेश असून यामुळे त्वचा फ्रेश होण्यास मदत होते.
ओरिफ्लेमच्या दक्षिण आशिया विभागातील प्रादेशिक विपणन विभागाचे वरीष्ठ संचालक नवीन आनंद म्हणाले, ”शहरी भागात राहणार्याप महिला प्रदुषित आणि धुळीने भरलेल्या वातावरणात राहतात. त्यामुळे आपल्या त्वचेला निसर्गाचा स्पर्श व्हावा, यासाठी त्या काहीही करायला तयार असतात. ही नवीन उत्पादन रेंज वापरतानाच त्वचेचे क्लिन्झिंग, अंडर आय क्रीम्सचा वापर, सेरमचा वापर आदी नियमित सौंदर्यप्रक्रियांचा अवलंब करून हायड्रेशन समस्यांवर ग्राहक मात करू शकतात. परिणामी, त्यांना नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्यपूर्ण तजेलदार त्वचा मिळू शकते.”