ओरिसा भवनाच्या गच्चीवर ओम आकारात टाइल्सचे तुकडे

0

नेरुळ । नवी मुंबईत प्रत्येक राज्याचे भवन असून पैकी ओरिसा राज्याचेदेखील भवन आहे. मात्र, या भवनाच्या गच्चीवर लावण्यात आलेल्या विविध रंगी टाइल्सच्या तुकड्यांत काही ठिकाणी तुकडे जोडून ओम आकार बनवण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई विश्‍व हिंदू परिषदेला हे समजताच ओरिसा भवनच्या अधिकार्‍यांना भेटून हे तुकडे काढून त्या ठिकाणी नवीन तुकडे लावण्यासाठी निवेदन दिले आहे. जर याबाबतीत तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा विश्‍व हिंदू परिषदेच्या कृष्णा बांदेकर यांनी दिला आहे.

ओम हे हिंदू धर्मीयांच्या आस्थेचा विषय आहे आणि ओडिशा भवन व्यवस्थापनाने हे कृत्य करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासंदर्भात विश्‍व हिंदू परिषद नवी मुंबईच्या वतीने निवेदन देण्यात आले व जर 3 दिवसांमध्ये ओम अक्षर असलेल्या टाइल्स काढून टाकल्या नाहीत, तर विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल
कृष्णा बांदेकर,
विश्‍व हिंदू परिषद,नवी मुंबई.