ओरीयनची किमया जिल्ह्यात प्रथम

0

जळगाव । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर करण्यात आला आहे. रावर्षी घोषित निकालामध्रे शहरातील सर्वच सीबीएसई शाळांच्रा 100 टक्के निकालामुळे संस्था, पालक व विद्यार्थ्रांमध्रे आनंदाचे वातावरण आहे.

केसीईचा निकाल 100 टक्के
केसीई संचलीत ओरीऑन सीबीएसई स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून, किमया हर्षल चौधरी (98.40) गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला, तर आशिष सुनील पाटील (98) जिल्ह्यांत द्वितीय स्थान पटकविला आहे. तर रोहन कोम्बे याने (94.20) टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले. शाळेतून 47 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात 9 विद्यार्थींनी 90 टक्के गुण मिळविले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे केसीई संस्था अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व प्राचार्य सुषमा कांची यांनी अभिनंदन केले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी शिक्षणाबद्दल शुभेच्छा दिल्या.

‘पलोड’च्या आयुषचे यश
विवेकांनद प्रतिष्ठान संचलित काशीनाथ पलोड स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून चौदा विद्यार्थ्यांना 90 टक्केपेक्षा अधिक गुण आहे. तर 27 विद्यार्थ्यांना 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. यात आयुश दिनेश येवले (97.80) प्रथम, सर्वेश राजेश भंगाळे (97.20) द्वितीय तर आकांशा संजीव दांडगे (94) टक्के गुण मिळवत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. दरम्यान, आयुश येवले व रिया पंकज पाटील या दोन्ही विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयांत 100 गुण प्राप्त केले आहेत. यशस्वीतांचे संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील, सचिव राजु नन्नवरे, कोषाध्यक्ष हेमा अमळकर, शालेय समिती अध्यक्ष धनंजय जकातदार, प्राचार्य अमित सिंग भाटीया व सर्व संचालक मंडळ व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सेंट जोसेफ स्कूल
सेंट जोसेफ स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून 47 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण आहे. यात आयुष वालेचा (97.2) प्रथम, विधुषी (96.2) द्वितीय तर अनुष्का नीले हीने (95.6) टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतून एकूण 212 विद्यार्थ्यांनी दहावींची परीक्षा दिली होती.

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यात सिध्दी चौधरी (94.2) प्रथम, सर्वस्वी पाटील (92.2 ) द्वितीय तर गायत्री चांदसारे (90.8) टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे. निकाल घोषीत झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

पाटील इंग्लिश मीडियम स्कूल
एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. यात तेजस सोंनजे याने (87) टक्के मिळवत प्रथम क्रमांक मिळविला तर हर्षल मराठे (78), ऋषीकेश आंबटकर याने (78) टक्के गुण मिळवत यश मिळविले आहे.

रुस्तमजी स्कूलची ईशा प्रथम
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात ईशा चौधरी (97.8) प्रथम, श्रीनिधी तेली (97.4) द्वितीय, समय सोंजे (96.2) तृतीय तर निशीका कोगटा हीने (95.8) टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.

केंद्रिर विद्यालय
केंद्रीय विद्यालयाची विणा पाटील (93) प्रथम, प्रियांशू पाटील (86) व्दितीय, वैभव पाटील (86) व्दितीय, जितेंद्र पाटील (85) टक्के गुण प्राप्त करून तृतीय आला आहे. वैष्णवी पाटील (81) तर अदिती शिंदे (79 ) टक्के गुण प्राप्त केले आहे.