ओवैसी म्हणतात अजूनही आहे बाबरी मशीद: ट्विट केले फोटो

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काज अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. भूमीपूजनाला काही तास शिल्लक राहिले असतांना एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केले आहे. ओवेसी यांनी बाबरी मशिदीचे दोन फोटो ट्विट केले असून, बाबरी जिंदा है असे म्हटले आहे.

“बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार इन्शाअल्लाह”, असे ट्विट ओवेसींनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाबरीच्या एका जुन्या फोटोबरोबरच रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान बाबरी मशिदीची वास्तू पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोनादरम्यानचाही फोटो ट्विट केला आहे.