ओव्हरटेक करतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप पलटली

0

नवापुर । शिरपुर व दोंडाईचा येथील प्रवासी घेऊन नवसारीकडे जाणारी जीप सावरट शिवारात पलटी होऊन झालेल्या अपघातात 13 जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. पोलीस सुत्रानुसार शिरपुर येथुन नवसारीकडे प्रवासी घेउन जाणार्‍या जीप (क्रमांक एमएच 46 झेड 6259) महामार्ग क्रमांक सहावर एकता हॉटेल समोर नवी सावरट शिवारात अन्य वाहनास ओव्हर टेक करतांना पलटी झाली. गाडीत बसलेले 13 प्रवासी जखमी झाले असून चालक देखील जखमी अवस्थेत असताना तेथून तो फरार झाला. महामार्गाने जाणार्‍या प्रवासींनी पलटी झालेल्या क्रुझर गाडीतून जखमींना बाहेर काढून विचारपूस करुन लागलीच विसरवाडी व नवापूर येथून 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला फोन करून बोलावले. जखमींवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. व नवापूर पोलीसांनी दवाखान्यात पंचनामा केला.

जखमी प्रवाशांची नावे
राजू मराठे 35 – चालक जखमी अवस्थेत फरार्रें योगेंद्र नानाभाऊ गिरासे वय 37, रा. विजलपुर नवसारी (गुजरात), दीपाली भूषण राजपूत वय 21, भूषण जतनसिंग राजपूत वय 28, नवलसिंग दादाभाई गिरासे वय 66, रेखा समाधान गिरासे वय 30, दुर्गेश समाधान गिरासे वय 10, दक्षित समाधान गिरासे वय10, काजल राजू बेडसे वय 14, रेखा राजु गिरासे वय 30, किरण राजू बेडसे वय 10 सर्व राहणार विजलपुर नवसारी (गुजरात) या प्रकरणी जीप चालक राजु मराठे याचे विरोधात नवापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे