सरकारकडून ‘ओसी’ न मिळालेल्या फ्लॅटवरील जीएसटी कमी करण्याचा प्रयत्न

0

नवी दिल्ली: २३ वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. घर खरेदी करु पाहणाऱ्यांना सरकार मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. निर्माणाधीन इमारती आणि बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी कमी करण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न साकार होणार आहे.

पूर्णपणे तयार झालेल्या फ्लॅटवर सध्या १२ टक्के जीएसटी आकारला जातो. तो ५ टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा विचार करीत आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या, मात्र भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींमधील फ्लॅटवरील जीएसटी सध्या १२ टक्के आहे. ‘विक्रीवेळी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या फ्लॅटवर जीएसटी लागत नाही. अशा प्रकरणांमध्ये विकासकांनी इमारतीच्या बांधकामावेळी विविध वस्तूंवर कर दिला असल्याने कराचा भार हलका होतो.