औरंगाबादमध्ये रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

0

औरंगाबाद : छावणी परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आनंद सूर्यभान मस्के (वय २५, गवळी शिवार, ता. गंगापूर), असे मृताचे नाव आहे. तो वाहनचालक म्हणून काम करीत होता.

पोलिसांनी सांगितले की, आनंदने शुक्रवारी दुपारी त्याचे मालवाहू पिकअप वाहन माल भरण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत उभे केले. त्यानंतर हप्ता भरण्यासाठी तो औरंगाबादमध्ये आला होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दीड वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. याविषयी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोहेकॉ. खंडागळे तपास करीत आहेत.