औरंगाबादला पोक्सो कायद्यावर कार्यशाळा

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ऑनलाईन उद्घाटन

चाळीसगाव- राज्यात पोस्को कायद्याचे पालन तंतोतंत व्हावे त्याचा लाभ व अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी महिला आयोगाने कंबर कसली असून नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित पोक्सो कायदा या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, औरंगाबाद परीक्षेत्राचे आय.जी.प्रकाश मुत्याळ, औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे, बार असोसिएशन अध्यक्ष अ‍ॅड.अतुल कराड, विविध राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे (चाळीसगाव) , गया कराड, विंदा किर्तीकर, नीता ठाकरे, आशा लांडगे उपस्थित होते.