औरंगाबाद : पिता व मुलीच्या नात्याला कलंक लावत नराधम पित्याने पोटच्या गोळ्यावर तब्बल 11 वर्ष अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार जिल्ह्यात उघड झाला आहे. पीडीता घरातून पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला व पीडीता मिळाल्यानंतर सत्य परीस्थिती समोर आली आहे. 40 वर्षीय नराधम पित्याला अटक करण्यात आली आहे.
अत्याचाराला कंटाळून सोडले घर
औरंगाबादनजीकच्या एका गावातील एका मनोविकृत पित्याने आपल्याच मुलीवर तब्बल अकरा वर्ष अत्याचार केला. मुलीच्या अजान वयात बापाने सुरु केलेला हा प्रकार ती सज्ञान झाल्यानंतर देखील सुरूच असल्याने पीडीतेने घर सोडले तर मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला तिच्या आईने अपहरणाचा गुन्हा नोंद केला मात्र पीडीतेचा शोध लागल्यानंतर मात्र खरा प्रकार उघडकीस आला.
आरोपी पित्याला अखेर बेड्या
या नराधम पित्यावर सन 2013 मधे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासाअंती त्याने जेलवारी देखील केली आहे. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने सदर अत्याचाराचा प्रकार सुरुच ठेवला. पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी नराधम बापाविरुद्ध बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली वेगळा गुन्हा दाखल केला आहे.