औवेसींना प्रसादांना फटकारले

0

नवी दिल्ली । एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मुस्लिम नागरिकांचा सन्मान आणि न्यायासंबंधित केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ’मुस्लिम नागरिकांची मते मिळत नसतानाही भाजपा त्यांना न्यायाने आणि सन्मानाने वागवत आहे’, असे वक्तव्य रविशंकर प्रसाद यांनी केले आहे.

यावर ’मुस्लिमांना सन्मान आणि न्याय देणारे तुम्ही कोण?. भारतीय घटनेने आम्हाला तसा अधिकार दिला असून आमच्या हक्कांचे संरक्षण झालेच पाहिजे, हे तुमचे काम आहे. रविशंकर प्रसाद हे कायदा मंत्री असल्यामुळे या नियमांची अंमलबजावणी करणे त्यांचं काम आहे’, अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली आहे.