औषधे पुरवठादारांचे दीड कोटींचे बील थकले

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या दवाखान्यासाठी औषध पुरवठा केलेल्या पुरवठादारांचे गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेने बीले अदा केली नाहीत. अंदाजे दीड कोटींची बीले थकली आहेत. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी पालिकेला औषध पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तीन ते चार दिवसात बीलांची अदागी न केल्यास पालिकेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा, चिंचवड येथील शशी इंटरप्रायजेसने दिला आहे.

स्मरणपत्रांची घेतली जात नाही दखल
महापालिकेच्या दवाखान्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांची खरेदी केली जाते. भांडार विभागामार्फत ही खरेदी होते. महापालिकेने औषध पुरवठादारांची बिले थकविले आहेत. बिलांची रक्कम अंदाजे दीड कोटी आहे. पालिकेने बिले थकविल्यामुळे औषधे विक्रेत्यांनी पालिकेला औषधांचा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शशी इंटरप्रायजेस स्वाईन फ्ल्यूचे मेडिसन पुरवित आहे. याबाबत इंटरप्रायजेसने महापालिकेला वारंवार पत्र पाठवून बीले अदा करण्याची विनंती केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तीन ते चार दिवसात बील अदा करावे, अन्यथा पालिकेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.

औषध पुरवठादारांची बिले थकली आहेत. भांडार विभागाने बीले लेखा विभागाकडे दिली आहेत. मुख्य लेखापाल राजेश लांडे म्हणाले, लेखा विभागाकडे बुधवारी (दि.13) बीले आली आहेत.
-प्रवीण अष्टीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त