औषध केंद्रात वातानुकूलित यंत्रणेची मागणी

0

नवी मुंबई । मनपाच्या वाशी, ऐरोली व नेरुळ येथील औषध वाटप केंद्रात वातानुकूलित यंत्रणा नसल्यामुळे अनेक औषध खराब होत आहेत.त्याचा परिणाम औषध सेवन करणार्‍या रुग्णावर होत असल्याने ह्या तीनही रुग्णालयातील औषध वाटप केंद्रात वातानुकूलित यंत्रणा बसवावी अशी मागणी जनकल्याण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष सैदाने यांनी केली आहे. ज्या ठिकाणी औषध आहेत त्या ठिकाणी वातानुकूलित यंत्रणा असणे गरजेचे आहे.या तीनही रुग्णालयातील भांडार गृहात जरी वातानुकूलित यंत्रणा असली तरी औषध वाटप केंद्रात आजही वातानुकूलित यंत्रणा नाही.त्यामुळे काही औषधांना विशिष्ट वातावरणात ठेवावी लागत आहेत.ही औषधे वातानुकूलित यंत्रणा अभावी खराब होत असल्याचे सैदाने यांचे म्हणणे आहे.

वाशी येथे रोज हजारो रुग्ण तसेच नेरुळ व ऐरोली येथे दररोज शेकडो रुग्ण येतात.त्यातील बहुतांशी रुग्णाची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे ते रुग्ण याच औषध केंद्रात येण्याची धन्यता मानतात. औषध वाटप केंद्रातील औषध निर्माण केंद्रातील कर्मचार्‍याना ही औषध द्यायची इछा नसते परंतु देणे भाग पडत असल्याचे एक औषश निर्मात्यांनी सांगितले. योग्य वातावरणात काही औषध ठेवली गेली नसल्याने त्यामधील असलेला परिणाम लुप्त होत असल्याचेही आरोग्य कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.अशी औषध घेऊन काहीही फायदा होत नसल्याने तो रुग्ण पुन्हा आजारी पडत असल्याचे संतोष सैदाने यांचे म्हणणे आहे.त्यामुळे श्रीमंत समजल्या जाणार्‍या मनपाने तीनही रुग्णालयातील औषध वाटप केंद्रात वातानुकूलित यंत्रणा बसवावी अशी मागणी नागरिकही मोठ्या प्रमाणात करत आहेत. मनपा रुग्णालयाच्या आवारात असणार्‍या खाजगी रामेश्‍वर मेडिकल केंद्रात वातानुकूलित यंत्रणा असताना आपल्या मनपाच्या अधिकार्‍यांना एव्हढेही कळत नाही का असा सवाल व्यक्त होत आहे.रुग्णालयात वास्तव्य करणार्‍या वैद्यकीय आधिकार्‍याच्या अनेक रूम मध्ये वातानुकूलित यंत्रणा आहे.या रूम मध्ये बहुतांशी डॉक्टर आरामही करत नाहीत.तेथील वातानुकूलित यंत्रणा खराब होण्याची चिन्हे आहेत.परंतु महत्वाच्या असणार्‍या औषध केंद्रात वातानुकूलित यंत्रणा नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. या बाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी दीपक परोपकारी यांना विचारले असता,चौकशी करून कारवाईचे आदेश देतो असे सांगितले.