कँटोन्मेन्टला ‘जीएसटी’त वाटा न मिळाल्यास कोर्टात जाऊ

0

काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा इशारा 

पुणे : भाजप सरकारने पुणे कॅन्टोन्मेन्ट बोर्डाला जीएसटी महसुलाचा वाटा द्यावा अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे.

बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांच्या समस्या मांडण्यासाठी बागवे यांच्या नेतृत्वाखाली बोर्ड कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन.यादव यांना निवेदन दिले. बागवे यांनी बोर्ड उत्पन्न वाढीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला. बांधकामांना एक एफएसआय आहे तो वाढवून मिळावा, करामध्ये वाढ करू नये, मिळकतींच्या हस्तांतरणाची प्रकरणं लवकर निकालात काढावी, सरदार पटेल रुग्णालयातील फी कमी करावी, निवृत्त कर्मचार्‍यांना मोफत आरोग्य सेवा मिळावी अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत.
मोर्चात प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, बोर्ड सदस्य अशोक पवार, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर तसेच करण मकवाणी, संजय कवडे, सेल्वराज अँथोनी, वैशाली रेड्डी, नंदा ढावरे, शोभना पण्णीकर, राधिका मखामले, कल्पना उनवणे सहभागी झाले होते.