कंगनाचा अखेर ‘पद्मावती’ला पाठिंबा

0

अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या सुरक्षेसाठी ‘दीपिका बचाओ’ या मोहिमेत स्वाक्षरी करण्यास नकार देत कंगना रणौत चर्चेत आली होती. आपल्या कठीण काळात कोणीच मदत न केल्याने तिने हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. या सर्व चर्चांवर आणि ‘पद्मावती’ या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणाने तिची मते मांडली. माझा दीपिकाला पाठिंबा आहे. मात्र, शबाना आझमी यांच्या राजकारणाला नाही, असे म्हणत कंगनाने ‘दीपिका बचाओ’ या मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला. ही मोहीम आझमी यांनी सुरू केलेली. यासंदर्भात तिने स्पष्टीकरण दिले की, ‘सद्यःस्थिती पाहता आपल्या सर्वांनाच एकत्र येण्याची गरज आहे.

वैयक्तिकरीत्या किंवा एकत्र येऊन आपल्या सहकार्‍यांसाठी काही मदत करणे शक्य असल्यास ती करावी. माझ्या सहकलाकारांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.’ त्याचप्रमाणे तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि दीपिकाला मिळणार्‍या जीवे मारण्याच्या धमक्यांचाही निषेध केला. ‘हे खूप चुकीचे आहे. पण याचे मला आश्‍चर्य वाटत नाही. कारण माझ्या बहिणीवर शाळेत असताना अ‍ॅसिड हल्ला झाला होता. व्यावसायिक वर्तुळाचा विचार केला, तर मलाही तुरुंगात टाकण्यासाठी एक सुपरस्टार प्रयत्न करत आहे. आपल्या समाजात अशा गोष्टी होतच असतात. स्त्री-शक्तीला संपवू पाहणार्‍या, मागास विचारसरणीच्या लोकांविरोधात सर्वांनी उभे राहिले पाहिजे.