यावलला अपघात ; वराडसीम गावात शोककळा
यावल– भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील ख्वाजा मशीदीजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजता हा अपघात झाला. या अपघातात मधुकर दगडू पाटील (65, वराडसीम, ता.भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला. पाटील हे विरावली येथे लग्नाला दुचाकी (एम.एच.19 एच.पी.4695) ने जात असताना समोरून भरधाव येणार्या कंटेनर (एच.आर. 61 बी.1384) ने धडक दिली. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला तर शव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.