पुणे । पुणे-बँगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळी 5 वाजता एक कंटेनर घसरला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
नवले ब्रिजच्या पुढे एक कंटेनर रस्त्यावरील वाहनांना धडक मारत चालला होता. काही वेळाने तो रस्त्यावरच घसरला. पोलिस कर्मचारी भूषण शेलार यांनी कंटेनरचा पाठलाग करून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.