रावेर : तालुक्यातील निंभोरासीम, ऐनपूर, खानापूर या गावांच्या कंटेन्मेंट झोनची शनिवारी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी पाहणी केली. यावेळी कंटेन्मेंट झोन मोडणार्यांवर तसेच होम कॉरंटाइन असणार्यांनी घरा बाहेर निघाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी निंभोरासीम या गावातील संपूर्ण नागरीकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या व त्यानंतर नंतर प्रांताधिकारी ऐनपूर गावाला भेट देऊन खानापूरकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी डॉ.सोनिया नाकाडे उपस्थित होत्या.