भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या अॅप्रेंटीशीपनिमित्त बिहारमधील पाटण्यात राहणार्या सचिन किशोर मेहरा (20) या तरुणाने गुरुवारी सकाळी रूमवर गळफास घेत जीवनयात्रा संपवली. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. शुक्रवारी तरुणाच्या मृत्यू बातमी कंडारीत धडकल्यानंतर शोककळा पसरली तर कुटुंबिय पाटण्याकडे मृतदेह घेण्यासाठी रवाना झाले असून शनिवारी या मृत तरुणाची दुपारी दोन वाजता कंडारी प्लॉट जेतवन बौद्धविहार भागातून अंत्ययात्रा निघणार आहे. मृत तरुणाच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, लहान बहीण असा परीवार आहे.