The body of a missing youth in Kandari was found in a well भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील रहिवासी विजय विनायक बनसोडे (36) हा नागसेन कॉलनी येथील घरून बेपत्ता झाला मात्र त्याचा मृतदेह रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास विहिरीत आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
शनिवारी घरातून झाला होता बेपत्ता
कंडारी येथील नागसेन कॉलनीतील रहिवासी विजय बनसोडे हा घर सोडून शनिवारी घरातून निघाला होता. या प्रकरणी शहर पोलिसात माहिती देण्यात आली होती मात्र या तरुणाचा मृतदेह रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गावातीलच एका विहिरीत आढळला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत बनसोडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.मयूर चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी केले. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आनंद विनायक बनसोडे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास संजय सोनवणे करीत आहे.