भुसावळ- तालुक्यातील कंडारीतील दंगलीची धग संपली नसतानाच पुन्हा शालेय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास श्री संत गाडगेबाबा हिंदी हायस्कूलसमोर घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार नरेंद्र मंगलसिंग राजपूत (30, महादेव मंदिराजवळ, कंडारी) यांच्या तक्रारीनुसार त्यांचा भाचा गुलशन विजय राजपूत व त्याचा मित्र सचिन उत्तम तायडे यांना संशयीत आरोपी कपिल साळवे संजय मोरे (पूर्ण नाव माहित नाही) यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.