भुसावळ- तालुक्यातील कंडारी येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून दोघा बालकांना चावा घेतल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे. ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. सोनाक्षी संदीप पाटील (5, रा.महादेव टेकडी, गणपती मंदिरा जवळ) दीपू प्रवीण घोडाम (8, रा.नागसेन कॉलनी) या बालकांना रविवारी व सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. मोकाट कुत्र्यांमुळे गावातील पालकांसह आबालवृद्धांमध्ये भीती पसरली आहे शिवाय मोकाट कुत्रे वाहनधारकांच्या मागे लागत असल्याने अपघात होण्याची भीतीदेखील आहे. अप्रिय घटनेपूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.