जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी मांडल्या व्यथा ; दलित वस्तीच्या विकासाची मागणी
भुसावळ- तालुक्यातील कंडारी गावातील दलित वस्तीत पाणी प्रश्न गंभीर बनल्याने तातडीने या भागात उपाययोजना कराव्यात तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त अनुसूचित व नवबौद्ध जातीचा विकास योजना मार्गी लावण्यासंदर्भात समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड यांची जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी भेट घेऊन व्यथा मांडल्या. समस्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन प्रसंगी देण्यात आले.
समस्या सोडविण्याची मागणी
तालुक्यातील कंडारी गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध जातीचा विकास होण्याकरीता महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त निवडक दलित वस्तीचा विकास योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात कंडारी गाव समाविष्ट असून तेथे अनुसूचित जाती व नवबौद्ध जातीचा विकास या योजनेची लवकरात तत्काळ अंमलबजावणी करूण दलित वस्तीचा विकास करावा तसेच कंडारी गावतील दलित वस्ती भागामध्ये पाण्याचे फार मोठे संकट असून पाण्याची सुद्धा योजना तत्काळ मार्गी लावावी, अशी मागणी गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान, या समस्यांबाबत यापूर्वी सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनाही निवेदन देण्यात आले होते.