कंडारी बु.॥ ग्रामसभेत हाणामारी ; सरपंचांसह सात लोकांविरुद्ध गुन्हा !

Kandari B. Clashes in Gram Sabha; Crime against seven people including Sarpanch! धरणगाव : तालुक्यातील कंडारी बु.॥ येथे घरकुल रद्द का केले, याचा जाब विचारल्याच्या वादातून एकाला सरपंचांसह 7 जणांनी मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरकुल रद्द का केले विचारल्याच्या रागातून मारहाण
बिबाबाई कालू पटेल (62) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बिबाबाई यांचा मुलगा शौकत कालु पटेल यांने सरपंच कौसरबी पटेल यांना माझे घरकुल का रद्द केले?, असे विचारणा केली. त्यावर रफिक हिलाल पटेल, फारुख हिलाल पटेल, कौसरबी हिलाल पटेल, शकील येडू पटेल, वाहेद इमाम पटेल, राजू दादामिय्या पटेल, बाबू सुभान पटेल (सर्व. रा.कंडारी बु. ता. धरणगाव) यांनी संगनमताने अश्लिल शिविगाळ, दमदाटी करून चापटा बुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास नाईक प्रमोद पाटील हे करीत आहेत.