पुणे । महानगर परिवहन महामंडळाला कंत्राटी पद्धतीने बस सेवा पुरविणार्या ठेकेदारांचे बस चालक थकीत वेतनासाठी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, असे असताना पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पसन्ना पर्पलसोबतचा करार रद्द केला आहे.
पीएमपीने सार्वजनिक वाहतुकीसाठी भाडेतत्वावर काही खासगी बस चालवते. त्यामध्ये प्रसन्न पर्पल या खाजगी संस्थेच्या 200 बसेस रोज रस्त्यावर धावतात. या बसचे चालक आज नियमित वेतन मिळत नसल्याचे कारण देत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत मुंढे म्हणाले की पर्पलने सर्व बस दररोज चालवल्या नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी त्यांचे पैसे रोखून धरले. म्हणूनच हा संप घडवून आणला आहे, असा आरोप मुंढे यांच्याकडून करण्यात आला आहे. पीएमपी आणि प्रसन्न पर्पल यांच्यात झालेल्या करारानुसार पगारासह बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीची आहे. मात्र, प्रसन्न पर्पल कराराचे पालन करीत नाही, यामुळेच मागील 2 महिन्यांपासून चालकांचे पगार झालेले नाहीत. याचा परिपाक संपात झाला आहे. कोथरूडमधील साधारण 200 पीएमपी बसेसचे चालक संपावर आहेत.