कंत्राटी विज कर्मचार्‍यांचा कामबंद आंदोलन सुरू

0

जळगाव। कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार संयुक्त कृति समिति महाराष्ट्र राज्यतर्फे कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. तिसर्‍या दिवशी 350 कंत्राटी आउटसोर्सिंग कामगारांनी जिल्हाभरातून आंदोलन स्थळी हजेरी लावली. आज मुख्यालय पातळीवर चर्चा होण्याची शक्यता होती. आंदोलन स्थळी जोरदार घोषणा बाजी करून प्रशासनच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यात आला.

चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव विभागामधील कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. सर्व मागण्या व आंदोलना मागची कृति समितिची भुमिका वर्कर्स फेडरेशनचे सर्कल सेक्रेटरी विरेंद्रसिंग पाटील यांनी सविस्तर विषद केली. श्री.पी एम अडकमोल, झोन सेक्रेटरी अरविंद देवरे , सर्कल अध्यक्ष भगवान सपकाळे ,जयसिंग जाधव,प्रभाकर सपकाळे, प्रमोद ठाकुर,विजय वराडे,संतोष सोनवणे, खेमचंद्र चौधरी यांनी प्रतिनिधित्व केले .