कंत्राट १०० कोटींचे होते मग ८५० कोटी कसे खाल्ले; छगन भुजबळांचा सवाल

0

गुहागर-दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या अटकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. १०० कोटींकचे कंत्राट दिले असताना ८५० कोटी कसे काय खर्च होतात अशी विचारणा त्यांनी केली. पाच फुटांच्या गाईला १५ फुटांचे रेडकू कसे होईल ? असा खोचक प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. नरेंद्र मोदींचा दिवसा भूलभुलय्या सुरु आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेनिमित्त गुहागर येथे ते बोलत होते.

‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात २५ हजार कोटी खाल्ले असे बोलतात. मग म्हणाले १० हजार कोटी खाल्ले. आता म्हणतात ८५० कोटी खाल्ले, अरे कंत्राट फक्त १०० कोटींचे होते. त्यामुळे ८५० कोटी कसे खाल्ले असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.