कंपवात आजाराविषयी शहरात आता समुपदेशन केंद्र उभारले जाणार

0

जळगाव । पार्किन्सन्स अर्थात कंपवात आजाराविषयी सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी, त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने जळगाव पी.डी.सपोर्टींग गु्रपची स्थापना करण्यात आली आहे. या गु्रपच्या माध्यमातून रुग्णाला त्यांच्या शारिरीक प्रकृतीबाबत प्लॅनमध्ये तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. आजाराला प्रभावीपणे तोंड देता यावे यासाठी आता समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून 26 एप्रिलपासून दर बुधवारी रुग्णांचे समुपदेशन केले जाणार आहे.

आजाराचे लक्षण : याआजारात काम नसताना अवयवांना असणारा कंप, ताठरलेले स्नायु, मंदावलेल्या हालचाली, पुढे झुकून चालण्याकडे कल असल्याने पडण्याची शक्यता वाढणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. याखेरीज चेहर्‍यावर भाव दिसणे, आवाज बारीक होणे, हस्ताक्षर बारीक होणे, गिळण्यास त्रास होणे, बध्द कोष्टता, झोप येणे, सर्व अंग दुखणे, खिन्नता तसेच अधिक लाळ सुटणे या तक्रारीही असू शकतात. या आजारात न्युरोफिजीशिअन डॉक्टरांच्या सल्ल्याने आजार नियंत्रणात ठेवता येतो. फिजिओथेरपी, स्पिच थेरपी, अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, डान्स थेरपी, समतोल आहार, मानसिक स्वास्थ्य यांच्या उपयोगाने कंपवात झालेल्या रूग्णांच्या तब्येतीमध्ये लक्षणीय बदल दिसून येतो.

हजारापैकी एखाद्यास
दरवर्षी 11 एप्रिल रोजी जागतिक कंपवात आजार दिवस म्हणून पाळला जातो. मंगळवारी या दिवसाचे औचित्य साधून मुंबईच्या पी.डी.एम.डी्एस जळगावच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून जळगावात पी. डी. सपार्टींग ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. सन 1871 मध्ये या आजाराचा शोध लावणार्‍या जेम्स पार्किंसन यांच्या नावाने हाओळखला जातो. आजार प्रामुख्याने 60 वर्षावरील व्यक्तीत आढळतो. या आजारात हातांना सुटणारा कंप, हालचाली मंदावणे, आवाजाचा खोलपणा, वाकुन चालणे, तोल जाणे, एकदम थांबून पुढचे पाऊल पडणे अशी लक्षणे दिसतात.