कचरा जाळल्याने धुराचे लोट

0
चिंबळी : खेड तालुक्यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील कुरूळी गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कंपन्या व गोदामे उभारल्याने हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या परिसरातील हॉटेल व्यावसायिक शुद्ध शाकाहारी नावाने बोर्ड लावून मासांहारी जेवण ठेवतात हेच शिल्लक राहिलेले मांसाहारी अन्न व घनकचराचा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला टाकले जातात आणि एकदम साठलेला घनकचरा पेटवून देतात. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर धुराचे लोट पसरत आहेत. रसय्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या दुचाकी वाहन चालकांसह प्रवाशीवर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.