पिंपरी चिंचवड :– घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत नागरिकांना आकारण्यात येणारे दरमहा 60 रुपये शुल्क रद्द करण्यात यावे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करून तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर माई ढोरे यांना केली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौर माई ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांकडून दरमहा 60 रुपये आकारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर वार्षिक 720 रुपयांचा बोजा पडत आहे. मध्यमवर्गीय आणि सधन कुटुंबांना ही रक्कम तुटपुंजी वाटत असली तरी हातावर पोट असणार्या नागरिकांना ही रक्कम देणे परवडणारे नाही. अशा नागरिकांकडून कचरा घेण्यासाठी शुल्क घेणे योग्य ठरणार नाही.
हे देखील वाचा