चाळीसगाव । भडगाव तालुक्यातील कजगाव बाजार समितीमध्ये काही एजंट व व्यापारी हे शेतकर्यांच्या भाजीपाला खरेदी लिलाव प्रक्रियेत शेतकर्यांच्या मालाची लूट करत असून यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. हि लूट थांबवावी म्हणून शेतकरी व रयत सेनेच्या वतीने सभापती मंगेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. पाचोरा भडगाव कृउबा समिती अंतर्गत कजगाव येथे भाजीपाला बाजारात शेतकरी त्यांचा भाजीपाला विक्रीसाठी आणतात त्याठिकाणी भाजीपाला बाजारात शेतकर्याची लुट सुरु असून भाजीपाला लिलाव प्रक्रिया सुरु असतांना बाजारात असलेले काही एजंट व व्यापारी याच्या संगनमताने शेतकर्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाला ढिगार्यावरून अथवा पोत्यातून दोन्ही हातात मावेल इतका भाजीपाला एजंट आपल्या पोत्यामध्ये टाकून मग ते शेतकर्याचा माल मोजतात. त्यामुळे शेतकर्याचे नुकसान होत आहे.
निवेदनात या केल्या आहेत मागण्या
राज्य शासनाने आडत न घेण्याचा निर्णय घेतला असतांना ही शेतकर्याकडून आडत वसुली केली जात असून यामुळे शेतकर्याची आर्थिक लुट केली जात आहे. शेतकरी हा निसर्गाच्या प्रकोपाने हवालदिल झालेला आहे. त्यात शासन त्यांना कुठलीही मदत देत नसून महाराष्ट्रात आज पावेतो अनेक शेतकर्यांनी कर्जबाजाराला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत,त्याच्या धान्य मालाला हमी भाव मिळत नाही शेतात टाकलेले भांडवलसुद्धा निघत नाही त्यात कजगाव बाजार पेठेत शेतकर्याची आर्थिक लुट होत आहे तर त्यांनी न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न त्याच्या समोर आ वासून उभा आहे. कजगाव भाजीपाला बाजारात शेतकर्याची होणारी लुट थांबवावी व शेतकर्यांना न्याय द्यावा अशी मागणी पाचोरा-भडगाव कृउबा समिती सभापती मंगेश पाटील यांना निवेदन दिले.
आंदोलन करण्याचा इशारा
शेतकर्यांना न्याय न मिळाल्यास संबंधीत शेतकरी व रयत सेनेच्या वतीने बाजार समितीच्या आवारात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर शेतकर्यांसह रयत सेना अध्यक्ष गणेश पवार, प्रमोद वाघ, पप्पु पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, गोरख साळुंखे, राजेश पाटील, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, देवेंद्र पाटील, विलास मराठे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सप्निल गायकवाड, पंकज पाटील, मयुर चौधरी, भुषण पाटील, चेतन पाटील, भिमराव खलाणे, उमेश पवार, गणेश बावीस्कर, गौरव नवले, बापु पाटील, अरुण देठे यांच्या स्वाक्षर्या आहेत.