जळगाव : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला आता कजगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळाला असून त्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांचा पाठपुरावा मोलाचा ठरला आहे.
प्रवाशांची मोठी गैरसोय टळली
कोविडच्या आपत्तीनंतर कल्याणमार्गे पुणे ते भुसावळ आणि भुसावळ ते पुणे हुतात्मा एक्सप्रेस सुरू झाली आहे. आधी या ट्रेनला भडगाव तालुक्यातील कजगाव रेल्वे स्थानकावर थांबा होता. तथापि, नंतर हा थांबा रद्द करण्यात आला होता. यामुळे नाशिक, कल्याणसह पुणे तसेच इकडे भुसावळकडे जाणार्या प्रवाशांची गैरसोय होत होती. या अनुषंगाने हा थांबा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी परीसरातील नागरीकांनी खासदार पाटील यांच्याकडे केली होती. खासदार पाटील यांनी या मागणीचा पाठपुरावा करून अप आणि डाऊन हुतात्मा एक्सप्रेसला कजगाव येथे थांबा मिळवून दिला आहे. याचा परीसरातील प्रवाशांना लाभ होणार आहे. दरम्यान, आता भुसावळ-देवळाली आणि भुसावळ-नाशिक या पॅसेंजर रेल्वे गाड्या देखील सुरू करण्यात याव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.