कट्टरपंथी मुस्लिमांकडूनच मोदींच्या लॉकडाउनला विरोध : वसीम रिझवी

0

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने सर्व भारतीयांच्या भल्यासाठी लॉकडाउनसारखा मोठा निर्णय घेतला आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वैर असलेलेच काही कट्टरपंथी मुस्लीम त्या निर्णयाला विरोध करत आहेत, असे वक्तव्य शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
पंतप्रधानांशी वैर असलेलेच काही मुस्लीम लोक लॉकडाउनसारख्या निर्णयाला विरोध करत आहेत. तसेच या लॉकडाउनमध्ये नियमांचे पालन देखील करत नाहीयेत. देव न करो की हा आजार मुस्लीम भागांमध्ये पसरो. जर असे झाले आणि त्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्यासाठी या लोकांनाच जबाबदार धरण्यात यावे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सरकारने खटले दाखल केले पाहिजेत, अशी मागणी रिझवी यांनी केली आहे.

तबलिकी जमात म्हणजे ‘करोना बॉम्ब’

करोनाच्या पार्श्वभूमीवर ही संघटना एक कारस्थान रचत आहे. लोकांमध्ये करोनाचा प्रसार करण्यासाठी लोकांना पाठवण्यात येत आहे. हा सर्वात मोठा धोका आहे. यासाठी सरकारला कठोर पावले उचलण्याची गरज असून त्यांच्याविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली होती.